कविता गरीब, गाणे श्रिमंत
कविता मनात, गाणे जनात
कविता उपकृत, गाणे सुश्रूत
कविता लाजवंती, गाणे स्मार्ट
कविता अबोल, गाणे बोलके,
कविता भाऊक,गाणे बौद्धिक
कविता तरल, गाणे सुरेल
कविता संक्षिप्त,गाणे आलापी
कविता सरळ, गाणे लयबद्ध
कविता फ़ुलते, गाणे झुलविते
कविता गहिवरते, गाणे रडविते
कविता प्रसव, गाणे संगोपन
कविता निरागस, गाणे जोरकस
कविता माझी,तुझी, एकेकाची,
गाणे जनाचे, सर्वांचे !
अलका काटदरे/२१.३.२०१३