शनिवार, २७ जून, २००९

आनंद

शोधायचा असतो आनंद
मानायचे असते सुख ...
राहायाचे असते स्वछंद
झटकून मरगळ मंद  


शोधुनिया सापडला नाही जर आनंद
सारायाच्या मागे आठवणी दु:खद
राहू दया त्याला कधीतरी सूट सुट
संपवू चला ना त्याला भेटण्याची रुखरुख ॥

रोज रोज त्याला सगळ्या घरी जायचे
आसवाना  ताब्यात ठेउन उभे तेथे ठाकायाचे
काम त्याचे अवघड जरी असे सारे
सेवेला नेहमी सादर असे तो सर्व घरे
त्याला न द्यायची सुट्टी हे खरे
काम त्याचे निपटाया आपणच बरे


असेल का तो पुस्तकात वा बगिच्यात
एखाद्या गाण्यात किंवा जिवाभावाच्या गप्पात ?
शोधू कुठे.. शोधू कुठे ??
दिसला ग बाई दिसला !!..

आनंद --त्याच्या डोळ्यात दिसला !
चालेल मला -जरी तो दुरून दिसला
घेइन मी झेप नक्की -पकडायला त्याला !
-Alvika
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा