** नाती-गोती **
****
नाती विविध रंगांची
एकेरी, दुहेरी, तिहेरी पदारांची
नाती जपायची
सासरची आणि माहेरची
नाती रक्ताची
कधी केवळ समजुतीची
नाती मोकळी मोकळी
बंधनात नाही बांधायची
नाती तऱ्हेतऱ्हेची
नाही नियमात बसायची
नाती रंक आणि रावाची
सर्वांनी सुखाने नांदायची
नाती विश्वासाची
श्वासात श्वास मिसळायची
नाती देवघेवीची
नाही उठाठेव करण्याची
नाती अनोळखी
शोधूनही नाही सापडायची
नाती दोघांनी पाळायची
पाण्यात नाही पाहण्याची
नाती जुळलेली
नाही कधी तुटायची
नाती जोडलेली
नाही कोणी तोडायची
नाती मनामनाची
नाही कधी विसरायची
नाती जन्मोजन्मीची
आजन्म पुजायची
नाती अशी ही
आबालवृद्धांनी पाळायची !
नाती तुलना सोन्याची
नव्याला सर नाही जुन्याची
नाती अतूट, अवीट मैत्रीची
प्रतिबिंब पाहती आपलीच ना ती !
नाती अथांग, गोती सापडण्याची
थांग लागताच होती माणिकमोती !!
********************
- अलका काटदरे