जुन्या काही आठवणीत माझ्या
तुम्हा सर्वांची पाने आहेत
सोनेरी क्षण वाळवलेले
आज मितिस जपून आहेत
येतात नित्य दसरा - दिवाळी
आनन्दाश्रू पहा लपून आहेत
सर्व मिळून सुख हास्य पसरु
आसमन्ति फ़ुले नटून आहेत
राग-रुसवे विसरून सारे
नाती नव्याने बहरून आहेत
जुन्या काही आठवणीत माझ्या....
नव्या आशा डोकावून आहेत !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा