काळजी घेशील ना ?
तुझी चाहूल लागली आणि आसमंत उत्साहाने फ़ुलून गेला
याचे श्रेय तुला का त्या धगधगत्या सुर्याला...
मला तू आवडतोस हे खरे का
तुझ्याशिवाय गत्यंतर नाही हे खरे
किंवा असे तर नाही .. उबदार थंडीकडे
जाण्याचा तू एकच मार्ग आहेस?
पण काही म्हण, तुझे ते रिमझिम बरसणे
गार वार्याबरोबर खेळत सुखाचा वर्षाव करणे
अहाहा..
सगळे कसे आल्हाददायक-
मग आपोआपच येतो वाफ़ाळलेला चहा,
मस्तसा फ़ेरफ़टका आणि तरल अशा गप्पा..
सुगीच्या दिवसांची स्वप्ने, पंखात ताकद
देणारी गाणी आणि अनामिक हूरहूर
तुझा विरह विसरून टाकणारी..
या सर्वात कधीतरी तुझा अवतारही
आठवतो बरं, वादळाच्या संगतीतला..
या वेळी काळजी घेशील ना रे?
-अलका काटदरे /६.६.२०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा