ऐन वेळी मला सोडी रे का तू
मना तू विचारी अविचार नको रे
आल्या प्रसंगी खंबीर रहा रे
मना लाडक्या हित जाणून घे रे
गोष्टी चार जुन्या, पण, समजून घे रे
मना जीवाला शांती असू दे
उधाण लाटांना परतून दे रे
मना प्रेषिता धर्म सोडू नको रे
कष्टाचे फळ जाणून घे रे
मना मिथ्या गोष्टी सोडून दे रे
संपन्न जगाची कास तू धरी रे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा