तुझे आकाश, माझे ही तेच
मला दिसले मोहक रंग
तुला काळे ढग .. .
निघालेलं भरभरून पडायला
कोठेतरी शेती करायला
चांदण्या लपल्या रंगात
मिस्किलपणे जागे ढगात
गडामगड गडामगड
खेळ चाले आकाशी
पाऊस पडे चहू राशी
पाऊस तुझा, तोच माझा
तुला आवडले भिजायला
मला स्मृती साठवायला
स्मृती तुझ्या नि माझ्या
त्याच एका वेळच्या
विविध रंग तरंगले
दोघांनाही हसवले ...
आकाशी रंग पांगले !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा