आवाजाची मला जन्मा भीती
हात यायचे दोन्ही कानी
बालपणी नदी किनारी
वैकुंठे कोणी जाई
वाहत्या झऱ्याचा झुळझुळ मग
त्यातच लुप्त होई !
शाळेला जाता बसचा ब्रेक
गप्पांना तेव्हाच कसे भरते येई
घसा खरडता औषध घेऊनी
सवय ही मोडीत जशी जाई !
अनोळखी येता कोणी घरी
विनोदावर त्यांच्या अलगद हसू
खुदू खुदु आमचे त्यावेळी
शब्द घेऊनी दोन बंद होई !
आली मग आगगाडी नशीबा
धावत गेले नित्य समांतर
त्याच गाडीत बसुनी मग
Ear phone कसा सेवे येई !
संसारात कूकर ची शिट्टी
बाळांची रडणी टीव्ही चालू
फेरीवाले चिंचोळ्या गल्लीत
मिश्रण कसे ते श्रवणीय होई !
गोविंदा गणपती
येती सारे रस्तोरस्ती
भल्या पहाटे जग झोपूनी
मंदिरी घंटा तशी प्रिय होई !
राहता राहिले ऑफिस सुंदर
सहकारी अन् मैत्रिणी जिवलग
शांतता नांदे एकमेका समजून
अंतरी आवाज तरी दबून जाई !
निवृत्तीला येता शरीर
मन करी आक्रोश
आवाज कुठे गेला
आवाज कुठे गेला !!
अलका काटदरे / १४.८.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा