शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

 आज  मराठी  भाषा दिन . 

मराठी  ही  आपली  मातृभाषा , त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहेच. पण ती अजून समृद्ध कशी होईल हे पाहायला हवे. 

त्यासाठी रोज काही ना काही लिहिणे जरुरी आहे. साहित्यात भर घालताना व्याकरणाला खूपच महत्व आहे. 

शुद्ध भाषा हीच खरी भाषा. 

मी जे काही लिहिले ते सुरुवातीला मराठीतच लिहिले. काही कवितांचे इंग्लिश मध्ये अनुवाद केले. तरी मातृभाषेत लिहिलेल्या भावना आणि अनुवाद करून लिहिलेल्या भावना यात थोडाफार फरक पडतो. मराठी भाषा अलंकार, वृत्त ह्यांनी समृद्ध आहे. प्रत्येक भाषेचे तिचे अलंकार असतातच. परंतु जर मूळ लिखाण मराठीत असेल तर इंग्लिश मध्ये अनुवाद करणे केव्हा केव्हा कठीण होते. 

आता हेच पहा ना =

माझी एक कविता, मी अशीच मरणार  नाही ! ह्यातील अशीच ह्याला इंग्लिश प्रतिशब्द काय होऊ  शकतो? Casual  ?

इंग्लिश मधून मूळ साहित्य असेल तर त्याचे मराठी अनुवादित साहित्य करणे सोपे वाटते कारण आपण त्या भावना आपल्या म्हणजे मातृ भाषेतून समजून घेतलेल्या असतात !!

असो. भाषा दिनाचं औचित्य राखून आपणा  सर्वांस हार्दिक शुभेच्छा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा