भविष्यवाणी --
करोना आला रे वळण लावूनी गेला
लक्षी राहील, तो कसा मेला
त्याचा सर्वांनी प्रतिकार
कसा हो केला
साधीशी, गोष्ट, होती
हात वारंवार धुण्याची
सर्वांनी स्वच्छता पाळून
आणि
पूर्व संस्कार स्मरून
त्या राक्षसाला, थोडे घाबरले मात्र
बाकी सर्व, राहिले जागरूक
थांबले सर्व प्रवास, केले जवळ आवास
केला संवाद, दुरुनी परी प्रेमाचा
लढविला किल्ला करोना चा
प्रेम वाढविले, संवाद सुरूही झाले
दूरस्थ एकीचे प्रयत्न ही केले
कणा त्याचा, मग सरसावला
जो मलूल पडून होता
सर्वसामान्य जागा झाला
आरोग्याला मानू लागला
स्वतःची नवीन ओळख झाली
आणि हा
चमत्कार झाला
त्या राक्षसाचा डाव मोडीत गेला
आला तो उगा ऐटीत
सर्वांना जागे करीत
खड बडले जरी खरे हो,
शिस्तीत राहिले सारे
हादरले थोडे जरी हो,
त्याचा नाश करूनच बसले
मेला तो, जळूनी खाक झाला
जिद्द अन संयम नियम झाला
करोना- मरो ना
दोन हात धरू ना
सर्वांनी सरसावू ना
राक्षसाचा नायनाट केला ना !
-- अलका काटदरे २२.३.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा