मारतो आहेस हाक अधून मधून
माहित आहे मला..
मुद्दामच दुर्लक्ष करते आहे !
ओ तुझ्या हाकेला एवढ्यात नाही मिळणार
आहे अजून मी व्यस्त आणि मस्त
माझ्या नानाविध बहुरंगी व्यापात
माहित आहे मला
तुला ह्याचाही कंटाळा येईल
वाट पाहशील आणि निघून जाशील
अगदीच निराश नको हाऊस
देईन हाकेला ओ सावकाशीने,
माझ्या सोयीने, आनंदाने
मुळीच नाही असेही नाही ! !
--- अलका काटदरे१७.२.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा