जखमा सांजवेळी..
जखमा सांज वेळी, सांगू कशा कुणाला
उघडूनी बंद झडपे, पूर मी करू कशाला...
गात्रे थकूनी निजती, हे ज्ञात ना कुणाला
रग मनीची जिरूनी जीव हा मलूल झाला
रात्री दिनी विचार, कुठला मला सलेना
भले बुरे करुनी मी जीव आटवू कशाला
ठिणगी ची साधी गोष्ट पडली कधी कळेना
उरल्या जीवाचे तुकडे जगी दाखवू कशाला ?
जखमा सांजवेळी...
अलका काटदरे /२.१०.१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा