आले हे कुठूनी, फुल पाखरू
रंग बिरंगी रेशमी कांती
सुगंध काढीत येई वृक्षि
शुभ्र फुला आकर्षित
झाले कसे हे , फुल पाखरू
मध चाखी केवळ मधुर
गुण गुणी ही तसेच मधुर
मधुर ह्या हिरव्या वेली
बसले केव्हा हे, फुल पाखरू
कांती मखमली मनही भावूक
नाजूक फुला नितळ गाली
भान हरपले का हो, फुल पाखरू
केव्हा, कोठून कसे का
आले,रमले,बसले
कोणते हे, फुल पाखरू !
अलका काटदरे/6.8.20
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा