आहे अजूनी आणि जगेनच पुन्हा
क्षण मंतरून, ओंजळी भरी कान्हा
कोलमडला नाही तेव्हाही गोवर्धन
खांदा भारी ऊब देऊनी, राहीला पान्हा
गोकुळ हे नांदे, ऊर्जा पसरवे सर्वा
नाही केव्हा चिंता, वस्त्रे पुरवी कान्हा
येता ग्रीष्म वाळली पाने, हो थोडीशी
श्रावणात मग बहरून गेला तो तान्हा
वेळ असे सर्वांना, एकमात्र औषध
येणार नाही नको ती वेळ पुन्हा पुन्हा !
अलका काटदरे/ ११.८.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा