काळे काळे कावळे, भेटती एका टाकी
कुठे आज मासा अन कुठे आज भजी
शित मिळेना सारे सण आले तरी
थेंब मिळेना कुणा रिकाम्या घागरी
कुणा चिमणीचे आज ठोठवू दारी
तुझे माझे कुणाचे बरे, ऐकावे परी
पाऊस आला मोठा झाडे ही पडती
कुठे बांधायचे घरटे, प्रश्न ही चर्चिती
काळे काळे कावळे आले मेटाकुटी
विचार मंथन होई पण राहती उपाशी !
अलका काटदरे/ १०.८.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा