ओघळलेले क्षण
येती पाठोपाठ आठवणी संगतीच्या
नजरेस नजर भिडता तुझ्या न माझ्या
दूरवर घुमला आवाज मौनाचा
गात्रे धावती विसरून अटी अंतराच्या
एका होई बाधा कशाची दूरवर
प्रतिबिंब पडे लख्ख नजरेत दुजाच्या
विचार पटले मने बिलगली एक झाली
एवढेच होते वास्तव साक्षी सर्वांच्या
सोनेरी दिवस कुठे जपून ठेवू हे
पोथडी भरली गोष्टींनी रम्य वेळेच्या
ओघळलेले क्षण पकडून मुठीत माझ्या
कटुता सारी विसरेन मी गत काळाच्या !
अलका काटदरे /June 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा