रविवार, ११ मार्च, २०१२

नव वर्षाचे स्वागत- २०१२

मागील पिढीने मोजले कष्टाचे  आणे
झाले सुसह्य आपले  म्हणून जगणे

आहे जवळ उच्च संस्कृतीचे लेणे 
लागतो आपण बहोत निसर्गाचे देणे 

हाती आपुल्या फ़क्त चांगले वागणे
वाजवूनी माणुसकीचे खणखणीत नाणे

वर्ष गेले, काय मिळवले किती पाहणे
हसूनी स्वागता सज्ज मी विसरूनी रडणे ! 
...३१.१२.११

प्रेमाची किंमत

प्रेमाची किंमत मोजावी लागते म्हणे-


वेगवेगळ्या रुपात-
कधी विरह, कधी आसू,
काही आठवणी, साथीला वेदना, दु:ख

आप्तांचा विरोध, तगमग तगमग
मार्गक्रमण भारी, निद्रा न येई लगबग 

कधी  मूक सहवास, कधी मुक्त संवाद,
स्वप्नांचे मनोरे, रुढींचे समास..

एवढे महागडे प्रेम... गंमत म्हणजे
ज्यांच्याकडे काही नाही, त्यांच्याकडेच असते !

कारण त्यांच्या या अमुल्य ठेव्याची तुलना
त्यांना दुसया कशाशीही करणे अशक्य असते

कुठेतरी आत जपणूक असते एका अहंकाराची
आपले प्रेम योग्य ठायी सोपवले गेल्याची !

मग जगरहाटीनुसार ते रास्त असो वा नसो...

मनात उर्मी असते जिंकण्याची
शेवटपर्यंत त्यासाठी लढा देण्याची !

अहंकार हा  मनातून नाहीसा झाला तर
निराशा नाही येत पदरी प्रेमभंगाची

कारण सतत  तेवत राहणे 
हीच तर असते महती खऱ्या  प्रेमाची !