सोमवार, २८ डिसेंबर, २००९

माझी डायरी

माझी डायरी दैनदिनी न्यारी
त्यात असणार प्रासंगिक वर्णन

एखादा सुंदर देखावा, किंवा मस्तशी ट्रिप
एखादा भीड़लेला पण प्रदर्शित न केलेला विचार

केव्हा काय झाले अन कोण काय म्हणाले
मला काय वाटले आणि पुढे काय करावे

एखादे गुपित, एखादी भावना अन संवेदना
जिच्यावर असेल फ़क्त माझाच अधिकार

कितीतरी गोष्टी तर अशाच असणार
ज्या मी कुणाला सांगू नाही शकणार

ज्या असतील वेदनेच्या पलिकडे
धावतील माझ्यासह सर्वांच्या पुर्वानुभावाकडे

कुणाच्या हातात जेव्हा ती पडेल
कणवेने ओथंबतिल त्यांची मने

ठायी ठायी असहायता अन घुसमटीचे दर्शन
आणि .. अजुन एक मिळेल मला मरण

मला नको असे अजून एक मरण...
              माझी डायरी मी नाही लिहिणार ...

भेट

भयानक होती
भेटण्याची आस

दाटुनी आली
कल्पनांची रास

अनुभवताना ती अधीरता
गात्राना  आली बधिरता

स्मृति वाफाळल्या
नीला रुन्दावल्या

तू अन मी
मी अन तू

आस वेडावली
रास ही कलंदली

वाफ ती जिरली
रूंदित भिनली

 भेट ..
तुझी अन माझी !

आठवण तुझी येता..

आठवण तुझी येता

मन झाले पाखरू

बसले जाउन सागारतिरी

विसावले जरा त्या झाडापाशी

डोकावले त्या आपुल्या देवालयी

फिरले पूर्ण वाचानालायामाधूनी

आठवण तुझी येता ..

झाले मी नतमस्तक

उभ्या राहिल्या तुझ्या अगाध लीला

ज्यानी आधार दिला मला लीलया

गात्रे झाली रोमांचित

वृत्ति गहिवाराल्या अवचित

आनंद चालला ओसंडून, भान गेले हरपून

आठवण तुझी येता ..

आठवण तुझी येता, जाता-येता

स्म्रुतीना तुझ्या मी बिलगले जिवलगा,

दुरावून गेले मी वास्तावा॥

आठवण तुझी येता..

रविवार, २० डिसेंबर, २००९

गुपित

सखे सांग सांग, सांग मला सांग
गुपित तुझ्या हसण्याचे --

काळजी वाटते मला तुझी हसू नको एवढी
चुकून केव्हा पडेल तुझी जखम ओली उघडी

हसता हसता डोळ्यात तुझ्या पाणी जमेल कधी
आनंदाश्रु नाहीत नक्की , हे मला कलेल आधी

नको मला कान कोंडे करू, तू अशी एकटी
काळजी वाटते मला तुझी हसू नको एवढी

रडून घे, मोकली हो, जागा ठेव डोळ्यांमध्ये
सारे काही होणार आहे सुरलीत तुझ्या जगामध्ये

आनंदाश्रु तेव्हा तुझी पाठ नाही सोडणार
दोन्ही डोले भरभरून वाहू तुझे लागणार

खात्री आहे उरी मला तुझ्या त्या उद्याची
तरीही-
सखे थांब थांब थांब हसायची थांब
सखे थांब, सखे थांब ...
-Alvika

आठव ते दिवस

आठव ते दिवस तू उन्हातल्या चटक्यांचे
धावत जाउन उभ्या राहिलेल्या सावलीत शिरण्याचे


एकामागून एक प्रसंगाशी हात कर ण्याचे
दिवसाकाठी हा एक संपला,म्हणून समाधान मानायचे

एक एका विचाराना बाजुला सारन्याचे
घाम पुशीत पिलाना आपुल्या घास भरवण्याचे


ओठावर हसू, डोळ्यात आसू, उरी दू:ख जपण्याचे
आठव ते दिवस तू आपुल्या व्यथित मनांचे

आशावादी ध्येयवादी दमछाक जीवांचे
मुक्कामी आल्यावर, विसावलेल्या गोजिरया  पायांचे

आठव ते आणि हे-ही दिवस तू सुखदु:खाचे
आठव दिवस तूझ्या माझ्या जीवनरूपी संग्रामाचे

आठव ते दिवस तू--- मी आता निघते...

-Alvika


शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

अमृत कलश

हा अमृताचा कलश भरभरून वाहे
जीवनाचे संचित मागे वलून पाहे

ना खेद ना खंत अंतरमानी राहे
जे जे प्राप्त त्याला मी ऋणी आहे

नाही जे गवसले, गंगेला मिळाले
सुख शांति विश्वास, पसरित नेले

अंतरी ताकद, भविष्याचे वेध सारे
मन माजे सुखावून भरारी मारे

॥ हा अमृताचा कलश भरभरून वाहे !
-Alvika

प्लानिंग

Somewhere, sometime in August 2008, i had scribbled something like this on Planning at 40m, satisfaction at 60:
Many a time we see that man plans and god disposes. It will sound negative, but it is not so.
Our planning for 60 will be of different types- financial, family life, emotional and very important 'time' planning.
Now as u will see, foremost thing comes to our mind when we utter the word planning is 'financial planning'.
Why?
because we do not want to be dependent on any one. We feel very much insecure if we do not have any means of living and that's why the case after our retirement. These days it is very easy to plan a life since the families are very small unlike in past. Then also, external forces influence us all. So i strongly feel that our planning should be in such a way that whatever situation arises, we should be able to cope up with that.
How?
We must have a sound cultural base and bond in the family, which we should always try to imbibe in our next generation. Giving is a natural tendency; if we pass it on to the next generation it will surely come back in a better way. While doing financial planning if we teach children value of money and the opportunity cost otherwise, it will help them understand our simple living. They will also realise that if we plan financially well now, our parents will not be our financial burden when they grow and have no income.
Emotional planning is already discussed.
Time planning is very important. Here i mean the post-retirement life (span). We should educate ourselves in such a way that we will never turn out to be 'empty mind'. When we are in fifties (if not 40s) we should try to inculcate some hobbies, health or educational regimes in our daily routines, which will be a part of our retired life. This will lead us to have avery healthy body thus healthy mind. We will be useful to our families and the society as well as if we are fit physically and mentally. Every one feels that at 60, our life should be very comfortable. But for that comfortable life, one should be able to enjoy that and from 50 onwards only, one has to introspect what are their concepts of comfort. I feel sound health- physical and mental. It enriches us and guides us in all circumstances.
-Alvika

How Long

How is that u wonder i am sitting still & tame
Count how many times i had to mince shame
How long will i be living with a Dead face?
Next life is waiting here since when.
How long should i wait for the Godo?
He came and decided to be here since then.
How far will i reach i do not know.
Reach is coming forward tells my sixth sense
-Alvika