रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

तुझे हे ऋण!

नाही विसरता येत..

सुखाचा शोध घेत घेत फ़िरले
नाही विसरता येत कोठे कोठे ते मिळाले

कधी फ़ुलात, कधी हळूवार झुळकेत
तर कधी कडकडीत उन्हातील
एखाद्या पाण्याच्या थेंब-स्पर्शात

सुखाचा शोध घेत घेत फ़िरले
नाही विसरता येत फ़िरता फ़िरता
कोठे आणि का मी अडखळले

सूख तर बरोबरच होते सदा सर्वदा
रोजचे कोवळे उन्ह, उगवता सूर्य
शांत चंद्र आणि ऊब पांघरलेली रात्र

चिमण्यांची चिवचिव, पक्षांची भिरभिर
झाडांची सळसळ, नदीची खळखळ
शोधूनही न सापडणारे असे हे सूख
अनुभवेल त्यालाच लाभणारे..

मी नेमस्त, शिस्तबद्ध..
पण निसर्ग क्रम कधी चुकला नाही
ऋण त्याचे फ़ेडायला अजून काही जमले नाही

नाही विसरता येत निसर्गा, तुझे हे ऋण
नाही जमत आम्हाला फ़ेडणे तुझे हे ऋण!

-अलका काटदरे ८.११.२०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा