रविवार, २० डिसेंबर, २००९

आठव ते दिवस

आठव ते दिवस तू उन्हातल्या चटक्यांचे
धावत जाउन उभ्या राहिलेल्या सावलीत शिरण्याचे


एकामागून एक प्रसंगाशी हात कर ण्याचे
दिवसाकाठी हा एक संपला,म्हणून समाधान मानायचे

एक एका विचाराना बाजुला सारन्याचे
घाम पुशीत पिलाना आपुल्या घास भरवण्याचे


ओठावर हसू, डोळ्यात आसू, उरी दू:ख जपण्याचे
आठव ते दिवस तू आपुल्या व्यथित मनांचे

आशावादी ध्येयवादी दमछाक जीवांचे
मुक्कामी आल्यावर, विसावलेल्या गोजिरया  पायांचे

आठव ते आणि हे-ही दिवस तू सुखदु:खाचे
आठव दिवस तूझ्या माझ्या जीवनरूपी संग्रामाचे

आठव ते दिवस तू--- मी आता निघते...

-Alvika


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा