सोमवार, २८ डिसेंबर, २००९

माझी डायरी

माझी डायरी दैनदिनी न्यारी
त्यात असणार प्रासंगिक वर्णन

एखादा सुंदर देखावा, किंवा मस्तशी ट्रिप
एखादा भीड़लेला पण प्रदर्शित न केलेला विचार

केव्हा काय झाले अन कोण काय म्हणाले
मला काय वाटले आणि पुढे काय करावे

एखादे गुपित, एखादी भावना अन संवेदना
जिच्यावर असेल फ़क्त माझाच अधिकार

कितीतरी गोष्टी तर अशाच असणार
ज्या मी कुणाला सांगू नाही शकणार

ज्या असतील वेदनेच्या पलिकडे
धावतील माझ्यासह सर्वांच्या पुर्वानुभावाकडे

कुणाच्या हातात जेव्हा ती पडेल
कणवेने ओथंबतिल त्यांची मने

ठायी ठायी असहायता अन घुसमटीचे दर्शन
आणि .. अजुन एक मिळेल मला मरण

मला नको असे अजून एक मरण...
              माझी डायरी मी नाही लिहिणार ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा