शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

"पानावरच्या दवबिंदूपरी…"

पानावरच्या दवबिन्दूपरी
असते खरेच का आयुढ्यदरी
खोल खोल भावनांनी भरलेली
उंच उंच स्वप्नानी पांघरलेली

सुगंधी वार्य़ाबरोबर ताठ उभारलेली
उन्हा पावसात आसरा देणारी
लांब रुंद आठवणीने थिबकलेली
हवीहवीशी वाटणारी, गूढ नगरी
पानावरच्या दवबिंदुपरी भासते क्षणभर
श्रध्देच्या पायावर मात्र विसावते अंगभर
अलगद, तरल, निर्मळ, मोहक
.... पानावरच्या दवबिंदुपरी
पाय सटकला जरा मात्र, मोहापायी
हीच दरी वागे दवबिंदुपरी
............पानावरच्या दवबिंदुपरी..

- अलका काटदरे

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२

वणवण


वणवण वणवण वणवण वणवण
फिरत राहिलो उन्हात रणरण

कणकण कणकण कणकण कणकण
वाळूत रेखिता दिसले ते क्षण

खणखण खणखण खणखण खणखण
सोने दाखवी आपुली चणचण

तणतण तणतण तणतण तणतण
थट्टा करावी नशिबाने किती पण

टणटण टणटण टणटण टणटण
घंटा वाजता निघालो सटकन


...
अलका काटदरे
· 8 January at 12:09

तुझी आठवण येते


तुझी आठवण येते हे मला समजून चुकले
मी नकळ्त माझ्या तुझी होते हेही कळले

सहवास असता मनी दुरावे सोसून काढले
गर्दीत भावनांच्या मला दूर लोटून पळले

नाही मजजवळ जरी आता तू मन दुखले 
दुखी मनी माझिया जरा डोकावून पाहिले

लख्ख प्रकाश पडे असशी जेथे तेथे तू
अदमास नाही आला कसे नाही सुचले

मम रात्रंदिन वाटे भास, आसपास तू
भास बरा की आठवण मना नाही ठरते

पुसून टाकण्या नाही येई कधी विचार
मी भाग्यवान मला तुझी आठवण येते !
..............अलका काटदरे

तुझी आठवण येते-

आठवणी संपतच नाहीत, एक काढली की दुसरी भळभळते;
तुझी आठवण येते- पुन्हा एकदा माझा सहभाग- 
........

रोज तिन्हिसांजा तुझी आठवण येते
नाही नाही म्हणता मी तुझीच होते

पोचला नसेल माझा निरोप तुला
वाटून मला मी भयभीत होते

उरी दगड मनी रम्य स्मृती
कशी आवरू मना तुझी आठवण येते

प्रेमाचा रंग निळा सावळा झुला
ममतेचा रंग पिता मन व्याकुळते

तुझा संग मला आता न उरला
भावनेशी बंड मला जरा न परवडते 

उन्हाळे पावसाळे हिवाळे सगळे तुझेच होते
कशी सावरू मना तुझी आठवण येते

भरून कधी नाही येणार शल्य
मी आठवू का मरू मन डगमगते

सुख दु:ख तुझ्यापाशीच येऊन पोचते
हसू आसु का दोन्ही मला न उमजते

प्रेम एकमात्र, अगाध सर्वत्र जाणवते
कशी थावरू मना तुझी आठवण येते 
...................अलका काटदरे
..........अलका काटदरे
 14 April at 09:24

काळजी घेशील ना ?


                 काळजी घेशील ना ?

तुझी चाहूल लागली आणि आसमंत उत्साहाने फ़ुलून गेला
याचे श्रेय तुला का त्या धगधगत्या सुर्याला...

मला तू आवडतोस हे खरे का
तुझ्याशिवाय गत्यंतर नाही हे खरे

किंवा असे तर नाही .. उबदार थंडीकडे
जाण्याचा तू एकच मार्ग आहेस?

पण काही म्हण, तुझे ते रिमझिम बरसणे
गार वार्‍याबरोबर खेळत सुखाचा वर्षाव करणे
अहाहा..

सगळे कसे आल्हाददायक-
मग आपोआपच येतो वाफ़ाळलेला चहा,
मस्तसा फ़ेरफ़टका आणि तरल अशा गप्पा..

सुगीच्या दिवसांची स्वप्ने, पंखात ताकद
देणारी गाणी आणि अनामिक हूरहूर
तुझा विरह विसरून टाकणारी..

या सर्वात कधीतरी तुझा अवतारही
आठवतो बरं, वादळाच्या संगतीतला..

या वेळी काळजी घेशील ना रे?

-अलका काटदरे /६.६.२०१२

रविवार, १ एप्रिल, २०१२

No Nonsense

No ladder, no bridges
Every one knows
I am just lying

No ring, no support 
Every one knows 
I am just floating 

No skates no bi-tri
Every one knows
I am just walking

No nonsense no timepass
Every one knows  
I am just living 

No ac no rosy
No one knows 
My  mind is dreaming! 

.. the Dreams flying 
 with Wings of Wind! 

दगड आणि देव

दगडात देव असतो म्हणे
आणि नुसता असतॊच नाही
     तर पाझरतोही म्हणे !

दगडातला देव पाझरतो पण
    तुझं मन कधी आर्दवतही नाही
म्हणून म्हणते, तुझ्यातल्या देवाला
    दगड म्हणायला हरकत नाही!

दगड काय, वीट काय, दोघेही सारखेच
    पण म्हणतात दगडापेक्शा वीट बरी
कारण पांडूरंग विठ्ठल उभा त्यावरी

आपला पाय दगडाखाली असण्यापेक्शा
वीटेवर ठेवलेला बरा रे.....
      तुला सर्वजण पांडुरंगा (!) तरी म्हणतील रे!

टाकू का एक वीट तुझ्या पायाशी
          ....  सोन्याची...
राहतॊ तुझ्यासमोर आम्ही उभे
घेऊन दगड डोक्याशी !

(जून २००६ मध्ये लिहिलेली)