साधारण २००७ -०९ चा काळ असावा. . मोठ्या मुलाची दहावी झाल्यामुळे थोडा वेळ मिळत होता सुट्टीच्या दिवशी. FB account उघडलेले, त्यामुळे जुन्या ओळखी शोधून काढणे, संपर्कात राहणे इत्यादी पासून online काहीतरी शिकणे अशा गोष्टी सवार झाल्या होत्या. त्यातूनच मायबोली या मराठी स्थळाशी गाठ पडली. आणि मग नादच लागला, जवळ जवळ दोन तीन वर्षे पूर्ण बुडून गेले होते. रात्री जेवणे झाल्यावर तास भर तरी नवीन computer वर, नवीन खेळण्याशशी खेळतात तसे सर्व चालू होते. तेथेच गझल प्रकार शिकायला मिळाला. त्यात काही सूर मारता नाही आला पण ओळख नक्की झाली आणि पुढे आपसूकच छोट्या थोड्या फार गझल लिहिल्या गेल्या, माझ्यापुरता.
गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३
पुण्यात एवढे काय आहे की जो जातो तो पुण्य नगरीच्या प्रेमात पडतो.
उद्या आपला येतच नसतो तरी
ही भूक नसती माणसाला
फुकट काहीच मिळत नाही
मीच मला माफ केले
लोकांची पडलेली असते मला
किती किती लाड केले तुझे
गेले कोठे हे तेहतीस कोटी देव
आदी वेगळा
दुसऱ्यासाठी जगायचे तर त्यांना गरज नाही
पाऊस आला की
जन्माला येतच असते
त्याला भेटण्याची नसे कुणा आस
खबरदारी घेतात, तो येऊ नये म्हणून पास
भेटायचंच आहे तर सुस्थितीत भेटावे ही इच्छा
त्यासाठी भले लोक मार्ग स्वीकारतात सच्चा
म्हणून मला वाटते, प्रत्येकाने-
एकदातरी त्याचे ओझरते दर्शन घ्यावे
एकदा तरी त्याला स्पर्श करून यावे
त्याच्या दरवाज्यात झाकल्यामुळे
तेथे जाणे किती सोपे आहे हे कळते
आपण त्याच्यापासून दूर नाही तसे
तो ही आपल्या सामोरे आहे, हे ही लक्षात येते
आयुष्याचा अर्थ तेव्हाच गवसतो
मनातील मनोरे व्यर्थ ठरतात
कार्य रथाचा पट समोर उभा ठाकतो
गात्रे पटापट कामाला लागतात
दिल्या घेतल्याचा हिशेब चालू होतो
आपण कुणाचे देणे नाही ना,
खात्री करू लागतो..
म्हणून म्हणते हे ओझरते दर्शन
खरेच चांगले असते -
कारण -
त्याच्याशी झालेल्या झटापटी नंतर
मनाची पूर्वतयारी होते
अनुभव गाठीशी राहतो
त्याने surprise visit दिली तर
आपण न डगमगता त्याला सामोरे जातो
आणि मनाची समजूत घालतो -
श्रेय हे सर्व विधात्याचेच आहे
त्याने मात्र हे सर्व घेणे आहे
माझे माझे म्हणणे सर्व फोल आहे
त्याच्यात विलीन झाल्यावर
उरणार फक्त नाव आहे
नावाला उपाधी कोणती द्यायची
हे उर्वरित जनता ठरवणार आहे !!
- अलका काटदरे / मकस 20.4.20
(प्रसव date February 2007)
एकट्याचे नाही हे माझे
वेध लागले तुझे रे
टक्क जागे दोन डोळे
चार ऐकतील दहा बोलतील
डोळ्यांत मरण घेऊन फिरते मी
प्रेम तुझे माझे राही
सर्वांना सोडून जायचे म्हटले म्हणजे
आली आली दिवाळी
उसंत मिळाली की घालते टाके चार
कुठे चाललो आहोत आपण
तुझा विचार मनात येताच
बदाम खाल्ले असते तर
चहाचे कप-
अमर कोणाला व्हायचे आहे
सध्या जगणे एवढे
old age is Gold Age
So rightly said ! Age is just a number. Never young or old, it all depends on your lifestyle. In one's thirties, one may do nothing and in eighties someone may perform live concert or go for treks or practise profession.
मला येत काही नाही
किंमत कळते आहे एकेक श्वासाची
आढावे घेऊन झाले
कोरोना कोरोना म्हणत
बारा महिने येतात एकामागून एक
आपल्याला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली आणि हे वर्ष आपण अमृत महोत्सवी म्हणून साजरे करत आहोत. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्या वर त्यातील बदल जाणवून घेण्यातच तसेच आपल्या विविध घटना तयार करण्यात पाच दहा वर्षे गेली. नंतर ते स्वातंत्र्य आपण अनुभवू लागलो. काही वर्षांनी स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी काळाआड गेली आणि आपण उरलो. ज्या पिढीला फक्त इतिहास रूपाने स्वातंत्र्य संग्राम माहित झाला.
ठरवले होते कविता नाही लिहायची
वाटले नव्हते आपलेच करतील असे बंड
जवळ पासचे लोक दिसेनासे झाले तसे
रंगांचे वेड केव्हा लागले माहित नाही
कित्ती छान कशाला कोणी बोललेच नाही
झुपकेदार शेपटा तिचा कोणी पाहीलाच नाही
सोहळे लशीचे
एवढ्यात जाऊ नका कोणी
काय केले मी काहीच नाही अजुनी
तू निमंत्रित पाहुणा नक्कीच नाहीस
जीवन
हे वर्ष तसे जगण्यातच गेले
aala divas aapala
सध्या रोज तुझाच विषय असतो
तिचे काय चालू आहे !