कित्ती छान कशाला कोणी बोललेच नाही
झुपकेदार शेपटा तिचा कोणी पाहीलाच नाही
आला गेला गाणी बजावणी अजुन काही
सुस्कारे तिचे कोणी केव्हा ऐकलेच नाही
राबणे जसा तिचा जन्मसिद्ध हक्क राही
जीभ त्यांची बोलण्या तिला फक्त पाही
राहिली नाही ओळख रक्तास कोणत्याही
बलिदान हे फुकट तरी वाटलेच नाही
राहावयास मन, खावयास शब्द
प्यायला कोळून लाज उरलीच नाही !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा