विद्येचा दाता तू , अनाथांचा नाथा
मुले तुझी सारी अन् तूच अन्नदाता
करिशी कृपा आम्हावरी तूच भगवंता
ठेविशी सुखात तूच, आहे अशी वदंता
लक्ष ठेव जरा , विसरू नकोस आम्हा
सेवा करती भक्त गण तूच आमचा त्राता
पिढ्यान् पिढ्या ऐकवतो आम्ही तुझ्या कथा
होऊ देत तुझ्या कृपेने सुकर त्यांच्या वाटा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा