रंगांचे वेड केव्हा लागले माहित नाही
गर्द हिरवा, पांढरा शुभ्र, मोरपिशी,
अबोली, नारिंगी आणि आकाशी
लहानपणी वर भव्य आकाश
बाबांचा सदरा आणि गणवेश
शाळा आणि घर हीच वेस
अभ्यासाचा ध्यास ही बाजू जमेस
थोड्या मोठ्या दुनियेत आल्यावर
रंगच रंग, काळे पांढरे ही सोबत
नाजूक, मनमोहक रंगीत फुले
त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे
सर्वच मोहमयी, रंगीन.
स्थिर निसर्गात अस्थिर मने
मनामध्ये सजले इंद्र धनुष्य
स्थिर झाले अस्थिर आयुष्य
वाटेवर उधळीत रंग
सज्ञान झाले रंगाचे वेड !
6.5.21
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा