एकट्याचे नाही हे माझे
माझे असे काहीच नाही
चांगले जे झाले ते
तुम्हा विना शक्य नाही
आई वडील, जोडीदार अन
मित्र मैत्रिणी तथा मुले
नातलग, शेजारी सामील त्यात
सर्वांची मी उपकृत
चुका झाल्या असतील नकळत
मला तेव्हा उमजले नाही
माफी मागते देवाकडे
पुनश्च असे होणे नाही
दिलदार सारे तुम्ही सुद्धा
क्षमा मला टाका करून
अलका काटदरे/२६.४.२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा