सर्वांना सोडून जायचे म्हटले म्हणजे
मन कसे भरून आणि भरभरून येते
साऱ्या जुन्या कडू गोड आठवणी
नेतात त्या थेट बालपणी
माझी शाळा, माझी पुस्तकं, माझी मैत्रीण
माझे गुरू, माझ्या सख्या
पुढे जाऊन माझे कॉलेज, माझी नोकरी,
माझे छंद, माझा संसार, माझा व्याप
सारे कसे माझे माझे होऊन जाते !
पण खरेच हे सर्व 'माझे' असते का !
किती गोड गैरसमजूत असते ती
मी ह्या सर्वामधील एक छोटासा भाग
स्वतः निर्माण केलेला, माझ्यापुरता !
ह्या वर्तुळातून मला वजा केले तर
ते वर्तुळ तेवढेच राहणार आहे सर्वांचे
आणि मी जाणार अजून एका वर्तुळात !!
निसर्गाची किमया किती अगाध आहे
आपण वजा होतो तेव्हा कवाडे बंद होतात
साऱ्या जाणीवांची , सुख दुःखांची
हे ही एक सुखच नाही का, जातानाचे !!
Feb.13,23
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा