बारा महिने येतात एकामागून एक
ठेवून जातात गुच्छ आठवणींचा अनेक
बारा महिन्यांचे विविध रंग
नसतात कधी एकमेका संग
एकेक महिना
येतो विविध कोडी सोडवत
सुप्त गोष्टी उलगडत
वेळ झाली की जातो धावत
एकेका रूढी ला अर्थ लावत
एकेक महिना
असतो तसा रमत गमत
करतो भरपूर गंमत जंमत
सुख दुःखाचा शिडकावा देत
जातो अनुभव पक्का करत
एकेक महिना
देतो धडे, प्रत्येकाला
लहान आणि मोठ्याला
बारीक सारीक गोष्टींना
महत्त्व प्रत्येक क्षणाला
शेवटचा येतो होऊन रंगेल
घेऊन रंगत भेटीगाठींची
लावून जातो चूक चूक
राहून गेलेल्या गोष्टींची
दाखवतो चाहूल स्वप्नांची
पुढील वर्षाच्या आगमनाची
पिसारे फुलवून ध्येयाचे
मना देतो उभारी आशेची !
@ alkakatdare 26.12.21
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा