देवा तुझे माझ्याकडे लक्ष नाही
आणि मी मात्र तुझ्या वर विसंबूनी
मला वाटले तू असशील सर्वज्ञ
का वेड पांघरशी समजून सर्व
तुझी सेवा केली, ठेविली अपेक्षा
चुकले मी, नाही ठेऊ केव्हा आशा
संत नाही रे मी, माणूस आहे
अती नसले तरी लोभ माया आहे
देवा तू आता कानाडोळा कर
बघेन माझे मी, तुझे काम तू कर !
१०.९.२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा