तू निमंत्रित पाहुणा नक्कीच नाहीस
आमच्या शब्दकोशात ही नाहीस
त्यात तुला स्थान मिळणार ही नाही
तू आमच्या प्रार्थनेत आलास
खूप दिवस नाही चालणार हे
बर्या बोलाने चालता हो
नाहीतर हाकलून देऊच आम्ही
खूप झाले तुझे खेळ आणि डाव
लहान मुले आहेत इथे, वाढू दे त्यांना
थोरानी तुला यापूर्वी ही पाहिले आहे
लक्षात ठेव ते बाणाहुन ही तीक्ष्ण आहेत
तुला काय साधायचे आहे ह्या नाटकात
वाईट प्रसिद्धी मात्र मिळेल तुझी
कोणतीच फसवणूक चालू नाही देणार
लक्षात घे तुझे डावपेच ध्यानी आले आहेत
सर्वांची तू खूपच परीक्षा पाहिली आहेस
पण आम्ही सर्व नियम नक्कीच पाळणार
तुझा पूर्ण अभ्यास केलाय आम्ही त्यासाठी
आमच्या संस्कारांना जागरूक आहोत आम्ही
तू या पृथ्वी वरुन निघून जा
नाहीतर आम्ही त्तुझा नाश करणार आहोत च !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा