दुसऱ्यासाठी जगायचे तर त्यांना गरज नाही
स्वत;साठी जगायचे, पण तसा स्वभाव नाही
काय करावे, काही कळत नाही.
कुणासाठी थांबावे तर वेळेवर पोचणे नाही
एकटे एकटे निघावे तर सोबतीचे सुख नाही
झेप घ्यावी म्हटले तर दोर माझ्या हाती नाही
तळ गाठावा म्हटले तर दलदलीचा भरवसा नाही
पुढे जावे वाटले तर पाठीमागे कोणी नाही
पाठी वळून पाहावे तर हाती काही लागत नाही
मैत्री करता एकाशी दुसरीकडे मैत्र नाही
नाही नाही म्हणता एकी कोठेच दिसत नाही
थोडेफार बोलले तरी तोंड काही लपत नाही
मौनापरी श्वासाला मोकळी वाट मिळत नाही
केल्याने होत आहे रे, समजत का नाही?
चांगले /वाईट मनाला माहित का नाही?
काही म्हणा, काय करावे काही कळत नाही
अलका काटदरे/ २१.२.१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा